प्रतिनिधी/ बेळगाव
सेंद्रिय शेती पद्धतीने हे धान्य उत्पादन करून सुदृढ समाज निर्मितीसाठी शेतकऱयांनी कार्यरत व्हावे असे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले. दि. 25 पासून बेळगावात सुरू होणाऱया सेंद्रिय कृषी उत्पादन विषयक प्रदर्शनाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी शहरातून जागृतीफेरी काढण्यात आली.
या फेरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी बोलताना शेतकऱयांना मार्गदर्शन केले. येथील कित्तूर चन्नम्मा चौकातून या जागृती फेरीला प्रारंभ झाला. विविध मार्गावरून फिरून ही जागृतीफेरी एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पोचली. त्या ठिकाणी शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जि. पं. चे सीईओ डॉ. के. व्ही. राजेंद्र, कृषी खात्याचे संयुक्त संचालक जिलानी मोकाशी, ज्ये÷ कृषी अधिकारी डॉ. व्ही. जी. पाटील, उपसंचालक एच. डी. कोळेकर, फलोद्यान खात्याचे उपसंचालक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.









