नवी दिल्ली
सॅमसंगच्या मोबाइल फोन चाहत्यांसाठी गॅलक्सी नोट 20 खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून भारतातील ग्राहकांना आता गॅलक्सी नोट 20 सिरीजच्या फोनकरीता प्रीबुकिंग करता येणार आहे. 6.7 इंचाच्या 8 जीबी अधिक 256 जीबीच्या या स्मार्टफोनची किंमत हजार 77 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर गॅलक्सी नोट 20 अल्ट्रा 5 जी (12 जीबी अधिक 256 जीबी) ची किंमत 1 लाख 4 हजार 999 रुपये असेल. प्री-बुकिंग करणाऱया ग्राहकांना मोबाइलवर 7 हजारपर्यंतची खरेदीवर सवलत मिळणार असून दुसऱया म्हणजे अल्ट्रा 5 जी फोनवर 10 हजारापर्यंत सवलत मिळेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. सॅमसंग डॉट कॉम व इतर प्रमुख स्टोअर्सवर हा फोन उपलब्ध असेल. अल्ट्रा हा कंपनीचा पहिला 5 जी स्मार्टफोन भारतात कंपनी लाँच करत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.









