नवी दिल्ली –
सॅमसंग आपला नवा गॅलक्सी एम 42 पहिला 5 जी स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल करणार असल्याचे समजते. सदरचा नवा स्मार्टफोन या महिन्यातच येणार असून तो कधी दाखल होणार यासंबंधीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा स्मार्टफोन याच महिन्यात आगामी काही दिवसात बाजारात दाखल होऊ शकतो. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजार रुपयांच्या घरात असेल. 5 जी सेवा देणारा सॅमसंगचा एम सिरीजचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 750 जी प्रोसेसरसह 6 जीबी व 8 जीबी रॅम प्रकारात हा फोन येईल.









