भारतात 8 वर्षांनंतर केले लाँचिंग : किमती 38,990 पासून सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगातील दिग्गज इलेक्ट्रिक उपकरण निर्मिती करणारी कंपनी सॅमसंग कंपनीने भारतामध्ये तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर नवीन लॅपटॉप सादर केले आहेत. खूप कालावधीनंतर कंपनीने जवळपास सहा नवे लॅपटॉप बाजारात आणले आहेत.
यामध्ये गॅलक्सी बुक 2360, गॅलक्सी बुक 2 प्रो 360, गॅलक्सी बुक 2 बिजनेस आणि गॅलक्सी बुक गो आदी मॉडेलचा समावेश आहे. सदरच्या लॅपटॉपमधील सर्वात स्वस्त गॅलक्सी बुक गो हे मॉडेल आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल नाही, तर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 7 सी जेन 2 चिपसेट आहे.
लॅपटॉपच्या किमती
या लॅपटॉपच्या किमती 38,990 रुपयांपासून सुरु होणार आहेत. कंपनीने कॅशबॅक ऑफर देण्याची घोषणा केली असून यात जवळपास 3000 रुपयापर्यंत सवलत मिळण्याचे संकेत आहेत. गॅलक्सी बुक 2 ची किमत 65,990 रुपये तर गॅलक्सी बुक 2360 ची किमत हि 99,990 रुपयापासून सुरु होत असल्याचे कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे.
लॅपटॉपमध्ये फोनमधील फिचर मिळणार
या हायएण्ड लॅपटॉपमध्ये इंटेलचा 12 व्या आवृत्तीचा चिपसेट दिला आहे. सॅमसंगने आपल्या लॅपटॉपमध्ये गॅलक्सीचे अनेक सॉफ्टवेअर आणि ऍप्स दिले आहेत. यात बिक्सी बाय, लिंक शेअरिंग, क्विक शेअर, सॅमसंग गॅलरी, सॅमसंग नोट्स आणि स्क्रीन सारख्या फिचर्सचा समावेश राहणार आहे.









