वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स येणाऱया काळात एफ सिरीजअंतर्गत नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे.
दक्षिण कोरियाच्या या कंपनीला स्मार्टफोनकरिता दुसऱया नंबरच्या सर्वात मोठय़ा बाजारपेठेत अर्थात भारतात स्मार्टफोन सादर करत आपला व्यवसाय विस्तारायचा आहे. त्यासाठी कंपनीने भविष्यकालीन योजना आखली आहे.
युवकांना लक्ष करून कंपनी येणाऱया काळात खास एफ सिरीजचा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत वीस हजाराच्या आत असण्याचा अंदाज आहे. उत्तम कॅमेरा हे या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून समजते. एफ सिरीजचा एफ 41 हा फोन येणाऱया काळात सादर केला जाणार असल्याचे सॅमसंगच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले व ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे, असेही समजते. कंपनीच्या गॅलक्सी एम सिरीजने भारतात चांगली लोकप्रियता मिळवलेली आहे. यानंतर आता कंपनीला एफ सिरीजचे स्मार्टफोन जे आपल्या वैशिष्टय़ांनी युक्त असतील ते भारतीयांसाठी कंपनीला सादर करायचे आहेत.









