बेंगळूर
स्मार्टफोन क्षेत्रात सॅमसंगने आपला नवा बजेटमधला गॅलक्सी ए 03 हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. 48 मेगापिक्सलच्या डय़ुअल कॅमेऱयासह या फोनला 5 हजार एमएएचची दमदार बॅटरी असणार आहे.
सदरचा गॅलक्सी ए 03 हा नवा स्मार्टफोन गॅलक्सी ए 02 ची सुधारीत आवृती असणार आहे. या फोनला मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी, चांगल्या क्षमतेचा कॅमेरा असणार आहे. सदरच्या फोनच्या किंमतीचा खुलासा मात्र केलेला नाही. 3 जीबी/32 जीबी, 4 जीबी/64 जीबी आणि 4 जीबी/128 जीबी स्टोरेजसह हा फोन सादर केला गेला आहे.
फोनची वैशिष्टय़े
स्क्रीन- 6.5 इंच 720 पी डिस्प्ले
बॅटरी- 5000 एमएएच
कॅमेरा- 48 मेगापिक्सल, डय़ुअल कॅमेरा, समोर 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा
बॉडी- प्लास्टिक
रंग- काळा, निळा आणि लाल









