कोरोना संकटापूर्वी आपण सर्वजण एखाद्या रुग्णालयात कुणा रुग्णाची देखभाल करण्यासाठी जात असू तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करत होतो. परंतु आता अशी स्थिती राहिलेली नाही. कोविडच्या काळात लोक सॅनिटायजरचा वापर साबणापेक्षा अधिक करत आहेत. परंतु मायक्रो बॅक्टेरियल तज्ञ सॅनिटायजरचा अतिवापर टाळण्याचा सल्ला देत आहेत. सॅनिटायजरच्या तुलनेत साबणाने हात धुणे अधिक उत्तम आहे. हात धुण्यासाठी अन्य पर्याय नसला तरच सॅनिटायजरचा वापर करा अशी सूचना आयसीएमआरच्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीटय़ूटमधील मायक्रोबायोलॉजीचे तज्ञ राजीव नीमा यांनी केली आहे.
सॅनिटायजरची मूळ संकल्पना एखाद्या पृष्ठभागाला स्टेरलाइज्ड करणे आहे. सॅनिटायजर पृष्ठभागाला विषाणू, बॅक्टेरिया, फंगस यासारख्या बाबींपासून मुक्त करतो. याचबरोबर डीएन, आरएन यासारख्या अत्यंत सुक्ष्म गोष्टीही साफ होतात.
सॅनिटायजरचे उपलब्ध प्रकार
बाजारात अल्कोहोलआधारित आणि अँटीबॅक्टेरियल असे दोन प्रकारचे सॅनिटायजर उपलब्ध आहेत. अल्कोहोलआधारित सॅनिटायजर कोविडकरता अधिक उपयुक्त आहे. सॅनिटायजरमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक अल्कोहोल असल्यास तो अत्यंत उपयुक्त आहे. तसेही 95 टक्के अल्कोहोल सर्वाधिक प्रभावी असते.
अल्कोहोलआधारित सॅनिटायजर
यात 60 ते 95 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल मिसळलेले असते आणि तो एथेनॉल, प्रोपेनॉल आणि आइसो प्रोप्रेनॉलने तयार केलेला असतो. हा किटाणूंपासून सुरक्षा करणारा आहे. याचा वापर मेडिकल डिसइंफेक्टमेंटही केला जातो.
अल्कोहोलमुक्त सॅनिटायजर
यात अँटीसेप्टिक मिसळण्यात आलेले असते. म्हणजेच यात मायक्रोबायल एजंट्स किंवा बेजाकोनियम क्लोराइड असतात. हा किटाणूंना पूर्णपणे नष्ट करतो. यात नैसर्गिक घटकही समाविष्ट केलेले असतात आणि त्यांच्यामुळे हाताची त्वचा मुलायम ठेवण्यास मदत होते.
दोन आठवडय़ात लस मिळणार

कोरोना लस स्पुतनिक व्हीची पहिली खेप दोन आठवडय़ांमध्ये तयार केली जाईल असे रशियाने स्पष्ट केले आहे. तर अमेरिकेचे आरोग्यतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी या लसीबद्दल संशय व्यक्त केला आहे. ही लस बाधितांकरता उपयुक्त ठरेल याबाबत संशय आहे. लस तयार करणे आणि ती सुरक्षित सिद्ध करणे या वेगवेगळय़ा गोष्टी आहेत असे फॉसी म्हणाले. परंतु रशियाने सर्व चिंता फेटाळल्या आहेत.
इंग्लंडमध्ये नवा आकडा प्रसिद्ध

इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बाधितांचा नवा आकडा जाहीर झाला आहे. नवा आकडा पूर्वीच्या तुलनेत 5,377 ने कमी दर्शविण्यात आला आहे. जुन्या आकडेवारीत बरे झालेल्यांनाही सामील करण्यात आले होते असा दावा सरकारने केला आहे. या नव्या घडामोडीमुळे ब्रिटनमधील कोरोनाबळींचे एकूण प्रमाण 46 हजार 706 वरून कमी होत 41 हजार 329 वर आला आहे.
चिकनमध्येही आता कोरोना

ब्राझीलमधून पाठविण्यात आलेल्या फ्रोजन चिकनच्या पंखात कोरोना विषाणू सापडल्याचा दावा चीनने केला आहे. मागील आठवडय़ात यांताई शहरात इक्वेडोरमधून पाठविण्यात आलेले मासेही संक्रमित आढळल्याचे म्हटले गेले होते. शेनझेनच्या स्थानिक रोगप्रतिबंधक केंद्राने नियमित तपासणीदरम्यान ब्राझीलमधून आलेल्या चिकनचा नमुना घेतला होता. चाचणीचा अहवाल होकारात्मक आला होता. परंतु अन्य उत्पादनांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
टाळेबंदी हटणार

चिली सरकारने राजधानी सँटियागोमधील टाळेबंदी सोमवारपासून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दिलासादायक असल्याचे उद्गार आरोग्यमंत्री एनरिक पेरिस यांनी काढले आहेत. लोकांनी बहुतांश वेळ घरातच थांबावे आणि मास्कचा वापर करावा असे सँटियागोचे महापौर फिलिप एलेसँड्री यांनी म्हटले आहे.
पेरू : रविवारी संचारबंदी

पेरूमध्ये प्रत्येक रविवारी संचारबंदी लागू करण्याची घोषणा अध्यक्ष मार्टिन विजकारा यांनी केली आहे. संसर्गातून बाहेर पडून एका चांगल्या स्थितीत परतण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे विजकारा यांनी म्हटले आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 4 लाख 98 हजार 555 रुग्ण सापडले आहेत. देशात प्रतिदिन सुमारे 7 हजार नवे रुग्ण सापडत आहेत.









