वार्ताहर/वार्ताहर
खोची ता. हातकणंगले येथील सृष्टी राजकुमार पाटील हिला ग्रुप ऑफ मिडीयाच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खा.राजू शेट्टी यांच्या हस्ते व आ. मानसिंगराव नाईक, दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांच्या उपस्थित गौरविण्यात आले.
ग्रुप ऑफ मिडीयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सत्कार सोहळयास अभिनेत्री माधवी पवार, भाग्यश्री कालेकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक संग्रामसिंह पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा शिंदे, अशोका अँग्रोचे संस्थापक सतीश पाटील, विशालभाऊ शिंदे, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, माजी नगराध्यक्षा झिनत आत्तार, ग्रुप ऑफ मिडीयाचे समुह प्रमुख सुनील पाटील,अध्यक्ष बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष गौतम माळी, सुजित शिंदे, विशाल पाटील उपस्थित होते.
कु. सृष्टी पाटील हीने अल्प वयातच वक्तृत्व क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शेतकरी आत्महत्या, संस्कार काळाची गरज, छत्रपती शिवाजी महाराज, महापूर तसेच कोरोनाचे संकट, यासह अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण वर्तृत्व सादर करुन प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटविताना मानाची बक्षिसेही पटकाविली आहेत. जीत मल्टीप्रपोज फाऊंडेशनच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी प थम क्रमांक पटकाविला आहे. ग्लोबल एज्युकेशन फौंऊडेशन आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. सृष्टी पाटील यांना आई स्वाती पाटील, वडिल राजकुमार पाटील, प्रा.बी. के.चव्हाण,बी.एम.कोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खोची पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Previous Articleविषारी दारू सेवनामुळे उत्तर प्रदेशात 5 बळी
Next Article ट्रम्प यांच्यावर बायडन संतापले









