उदय सावंत/ब्रम्हकरमळी
सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाचा ब्रह्मकरमळी येथील सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव आज दि. 1 जानेवारी रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. आजपासून गोवा तसेच महाराष्ट्र-कर्नाटक भागातून भाविक ब्रह्मदेवाच्या पायरीशी लीन होण्यासाठी मोठय़ा संख्येने या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. आयोजन समितीच्यावतीने याची पूर्वतयारी पूर्ण केली असून दिवसभर धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद व इतर कार्यक्रम होणार आहेत.

सत्तरी तालुक्मयातील धार्मिक व पारंपरिक उत्सवापैकी नगरगाव पंचायत क्षेत्रातील ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव देवस्थानात आयोजित करण्यात येत असलेल्या ब्रह्मोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. गोमंतकातील जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची विशेष ओळख आहे. यामुळे हजारो भाविक या देवस्थानाशी निगडित झालेले आहेत. यंदाचा उत्सव हा जरी मर्यादित स्वरूपाचा होणार असला तरी सामाजिक अंतर व आवश्यक खबरदारी घेत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दुग्धशर्करायोग म्हणजे 2021 साली देवाच्या एकूण इतिहासामध्ये विशेष नोंद करणारा राहणार आहे. कारण आतापर्यंत एकाच वर्षात दोन वेळा ब्रह्मदेवाचा उत्सव साजरा करण्याची संधी भाविकांना लाभली नव्हती. यंदा मात्र याच वषी दोन वेळा ब्रह्मदेवाच्या ब्रह्म ब्रह्मोत्सवाचा आनंद व भक्ती यात्रा साजरा करण्याची संधी लाभलेली आहे.
वाळपई शहरापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मकरमळी छोटय़ाशा मात्र निसर्गाने भरभरून सौंदर्य निर्माण केलेल्या या परिसरात देवस्थानाचे सुंदर व सुबक असे मंदिर आहे. शेकडो वर्षापासून या देवस्थानचा हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे या देवस्थानचे सौंदर्यीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून यासंदर्भात निविदा जारी करण्यात आलेली आहे. मात्र अजून पर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. येणाऱया काळात गोव्यातील मंदिर क्षेत्रांमध्ये या देवस्थानाचा खास उल्लेख पर्यटनाच्या नकाशावर झळकून येणार आहे. यामुळे येणाऱया काळात या देवस्थानच्या माध्यमातून गावाच्या विकासाला एक वेगळय़ाच प्रकारचा मार्ग सापडणार आहे .याला अर्थातच स्थानिक आमदार व राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्रयत्न केले होते व गोवा सरकारने याला मान्यता दिल्यानंतर देवस्थानचा पर्यटन दुष्टीकोनातून विकास करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
विकासात ब्रह्मदेवाचे योगदान : सखाराम देसाई.
सखाराम देसाई यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ब्रह्मकरमळीच्या विकासात ब्रह्मदेवाचे महत्त्वाचे योगदान आहे. ब्रह्मदेवाच्या रूपाने गावाला वैशिष्टय़ निर्माण झालेले आहे .यामुळे ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा कर्नाटक महाराष्ट्र व इतर राज्यातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या देवाच्या पायरीशी लीन होतात. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे .यंदा मात्र दोन जवजी एक दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे.
उत्साहाला एक वेगळय़ा प्रकारचे उधाण : यशवंत सावंत
गावचे ज्ये÷ नागरिक यशवंत सावंत यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शेकडो वर्षापूर्वी सदर ब्रह्मोत्सव साजरा करण्याची संकल्पना रुढीला आली दरवषी वेगवेगळय़ा प्रकारे या उत्साहाला एक वेगळय़ा प्रकारचे उधाण येत आहे. सर्व नागरिकांची एकजूट व देवस्थानाची आख्यायिका अखंडपणे अबाधित राहावी यासाठी सर्व नागरिकांचे व भाविकांचे अगणित सहकार्य लाभत आहे ही खरोखरच ब्रह्मदेवाची कृपा आहे.
कोविडमुळे एक दिवसाचाच कार्यक्रम : वामनराव देसाई
आज ब्रह्मदेवाच्या कृपेने ब्रह्मकरमळीला वेगळय़ा प्रकारची प्रतिमा निर्माण झालेली आहे. या गावाला विकासाचा ध्यास लागलेला आहे. त्याला ब्रह्म देवाची कृपा आहे. कोवीडमुळे दोन दिवसीय उत्सवा ऐवजी एक दिवशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र पारंपरिकता व धार्मिकता यावर कोणत्या प्रकारचे खंड पडणार नाही याची विशेष दखल घेऊन हा साजरा करण्यात येत आहे. यामुळे येणाऱया नागरिकांनी देवस्थानाच्या समितीला व आयोजकांना सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन माजी सरपंच वामनराव देसाई यांनी केले आहे.









