प्राचीन मुद्राशास्रातील ही एक प्रभावी मुद्रा आहे. सूर्यमुद्रा करण्यासाठी अनामिका (करंगळीजवळील बोट) अंगठय़ाच्या मुळाशी लावून अंगठय़ानं त्यावर थोडा दाब द्यावा.
ही मुद्रा सकाळ-संध्याकाळ दिवसातून दोनदा पाच ते पंधरामिनिटांपर्यंत करावी.
फायदे काय?
- ही मुद्रा लठ्ठपणा घालविण्यासाठी उपयुक्त आहे.
- शरीरात उष्णता निर्माण होते आणि पचनक्रिया सुधारते. शरीरातल्या चरबीचं प्रमाण कमी होतं.
- थायरॉईड ग्लँड म्हणजे कंठस्थ ग्रंथीच्या विकारांवर ही मुद्रा प्रभावी ठरते.
- या मुद्रेनं अग्नितत्त्वाची वाढ होत असल्यानं दमा, सर्दी इत्यादी कफ विकारात सुधारणा होते.
- मलावरोधाचा त्रास कमी होतो.
- मानसिक ताण जातो.
- अशक्त व्यक्तींनी ही मुद्रा करू नये.