खगोलीय घटना, वातावरणातील बदलाचा परिणाम, खगोल तज्ञांचे बदलाच्या प्रक्रियेवर निरीक्षण
प्रतिनिधी / कोल्हापूर
सूर्याभोवती खळे पडणे या घटनेला खगोलशास्त्रात वेगळे महत्व आहे. सूर्याभोवती असणार्या वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. सोमवारी सूर्यभोवती पडलेल्या खळ्याचे दर्शन कोल्हापूरकरांनी अनुभवले. खगोलशास्त्रातील तज्ञांनी या घटनेचे निरीक्षण करत अभ्यास केला. रविवारी रात्री कोल्हापूर शहरासह जिल्हय़ात प्रचंड पाऊस झाला होता. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने वातावरणात प्रचंड गारवाही निर्माण झाला होता. गेले काही दिवस पावसाने ओढ दिली आहे. ऑक्टोबर हिटसारखे वातावरण सध्या कोल्हापूरकरांनी ऑगस्टमध्ये अनुभवले आणि आता सप्टेंबरमध्येही अनुभवत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि सोमवारी दुपारी सूर्याभोवतीच्या वातावरणतील बदलामुळे झालेल्या खळ्याच्या दर्शनामुळे खगोलीय घटना अनुभवयास आली.
सूर्याभोवती पडणारे खळं आणि त्यामागचे शास्त्रीय कारण या विषयी विवेवकानंद कॉलेजमधील पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी ‘तरुण भारत’शी संवाद साधत माहिती दिली. ते म्हणाले, सूर्याभोवती पडणारे खळं हे physics मधील ऑप्टीकसचा भाग आहे. सूर्या भोवतालचे खळं किवां रिंगण हे प्रिझम (लोलक) मधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हॅलो (halo) असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात.
वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये लाखोंच्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिप्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. यामध्ये बर्फाचे असणारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात. पाण्याचा रिप्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1. 33 आहे. पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेव्हा घनपदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते. यामध्ये कुठीलीही अंधश्रद्धा बाळगू नये.
खळं दिसण्यामागे कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये
सूर्याभोवती पडणारे खळे या घटनेला खगोलशास्त्रात महत्व आहे. ही घटना घडताना होणाऱया वातावरणीय बदलांचा खगोलशास्त्रातील अभ्यासक, संशोधक अभ्यास करत असतात. खळं दिसण्यामागे कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये.
-प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख, विवेवकानंद कॉलेज, कोल्हापूर









