वार्ताहर / खानापूर
खानापूर घाटमाथ्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या इतर सर्व खर्चास फाटा देत कोविड सेंटरच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. घाटमाथ्यावरील कोरोनाच्या रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी खानापूर येथे डॉ उदयसिंह हजारे यांच्या पुढाकाराने ३० बेडचे उपचार केंद्र उभारण्यात आले असून या कोविड सेंटरचे उद्घाटन खानापूर नगरपंचायतच्या मुख्यधिकारी आश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, शंकरराव देवकर, गणपतराव भोसले, मनोहरशेठ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडसह साध्या बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सुहास शिंदे व डॉ उदयसिंह हजारे यांच्या पुढाकाराने मातोश्री कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
सध्या या कोविड सेंटरमध्ये एकूण ३० बेड असून त्यामध्ये १५ ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर १३ व पोर्टेबल व्हेंटिलेटरचे दोन बेड उपलब्ध आहेत. डॉ उदयसिंह हजारे यांनी आठ दिवस अथक प्रयत्नातून सेंटरची उभारणी असून यामध्ये डॉ. अलोक नरदे, डॉ. प्रशांत ताड, डॉ. के. आर. पवार, डॉ. बाजीराव जाधव, डॉ. वैशाली हजारे, डॉ. नेहा हजारे, डॉ. हणमंत जाधव हे सेवा देणार आहेत.
कोविड सेंटरच्या उभारणीत खानापूर घाटमाथ्यावरील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मोठी मदत केली आहे. खानापूर जनता विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांकडून दोन एकावन्न हजार, शंकरराव देवकर यांचेकडून ५१ हजार, ॲड भगवानराव गायकवाड, साई कन्स्ट्रक्शनचे अनिल शिंदे, बेणापूरचे माजी सरपंच कृष्णदेव शिंदे यांच्याकडून प्रत्येकी एक ऑक्सिजन मशिन, मातोश्री वेणूताई चव्हाण महिला प्रसारण शिक्षण मंडळ पंचवीस हजार, पांडुरंग गायकवाड दहा हजार, अदिती कन्स्ट्रक्शन पळशी दहा हजार, शहाजी भगत ५० पीपीइ किट, ॲड युवराज गोडसे यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पाच हजार, वैभव टिंगरे, प्रकाश जोशी यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार यांच्याकडून सेंटरला मदत देण्यात आली. त्याचबरोबर विविध प्रभागमध्ये मास्क, सेनिटायझर, ग्लोज, वाटप करण्यात आले.
यावेळी बानूरगडचे सरपंच सज्जन बाबर, हिवरेचे सरपंच रामकृष्ण सुतार, ताडाचीवाडीचे सरपंच अनिल मंडले, बेणापूरचे उपसरपंच प्रकाश जाधव, बलवडीचे उपसरपंच दिनकर गायकवाडउपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








