प्रतिनिधी / बेळगाव
सुहास्य परिवारचा 18 वा वर्धापन दिन व दीपा श्याम कामत यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि. 4 रोजी अनगोळच्या बागेत झाला. अध्यक्षस्थानी परिवारचे संस्थापक अरुण जाधव व प्रमुख अतिथी म्हणून तुषार चिटणीस उपस्थित होते. प्रा. बळीराम कानशिडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. गणेश स्तवनाने समारंभाची सुरुवात झाली. पाहुणे चिटणीस यांच्या हस्ते अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सुहास्य परिवारची स्थापना 4 एप्रिल 2003 रोजी आरपीडी कॉलेजच्या मैदानावर करण्यात आली होती. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच स्त्राr-पुरुष मंडळी हजर असत. या परिवारचे संस्थापक स्व. ठक्करजी ! यांनी स्थापन केलेला हाच परिवार आज वडगाव, बेळगाव शाळेच्या क्रीडामैदानावर व्यायामाचे धडे घेत आहे. तिच परंपरा संस्थापक अरुण जाधव यांनी अव्याहतपणे 18 वर्षे ठेवली आहे. आज जवळजवळ स्त्री-पुरुषांची संख्या 100 ते 110 पर्यंत आली आहे. आज या सुहास्य परिवारचा वर्धापन दिन साजरा होत आहे ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे.
यावेळी महाराष्ट्र बँकेतून 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल दीपा श्याम कामत यांचा आशाताई अरुण जाधव, हेमलता व. कानशिडे, विजयालक्ष्मी भंडारी, रंगरेज यांनी यथोचित सत्कार केला.
प्रसंगी हेमलता कानशिडे यांचा गाण्याचा बहारदार कार्यक्रम झाला. कल्पना रंगरेज, परशराम भंडारे (वकील) यांनी गाणी व गझल सादर केली. तसेच सुरेखा भंडारी व जयश्री यांनी सुमधुर गाणी सादर केली.
त्यानंतर सुहास्य परिवारचे संस्थापक अरुण जाधव यांनी रामचंद्र काटकर, पुष्पा भोसले, वनिता पाटील या मान्यवरांचा सत्कार केला. त्यानंतर करमणुकीचे, क्रीडा गेम, हॉलीबॉल कॅच करणे, कंगण अधिक भरणे यासारखे खेळ खेळण्यात आले. व मनमुराद आनंद लुटला.
दीपा कामत यावेळी उद्देशून म्हणाल्या की, सुहास्य परिवार हा एक आदर्श परिवार आहे. हे एक कुटुंब आहे. हे एक छोटेसे विश्व आहे. अनेक भाषा, विविध पेहराव करणाऱया लोकांचे मंडळ आहे. येथे शिस्त आहे. येथे मन रमते. आणि समाधान प्राप्त होते. प्रत्येकाला न्यायाची अत्यावश्यकता आहे. यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. मी यापुढेही नित्यनियमाने सुहास्य परिवारमध्ये अधिक वेळ देते.
या कार्यक्रमाला परिवारचे खांडेकर, काळे, रामगोपाळ, तुकाराम पाटील, मोरे, डोंगरे, कांदेकर, शिवाय पुण्याहून चिटणीस परिवार, अरुण जाधव परिवार आवर्जुन उपस्थित होते. महिलांची उपस्थिती अधिक होती. अध्यक्षीय भाषणानंतर खांडेकर यांनी आभार मानले. प्रा. बळीराम कानशिडे यांनी सूत्रसंचालन केले.