प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील संत मीरा शाळा येथे चालणाऱया सुहास्य क्लबचा 21 वा वर्धापन दिन रविवारी शाळेच्या मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूळचे हजुगिरी सध्या नांदेड येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुरेश पुरी होते.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मनोहर कामू, मारुती जरळीकर, किशोर असलकर व संचालिका रजनी मिर्जी यांनी केले. जगदीश बिर्जे यांनी परिचय करून दिला. ज्येष्ठ संचालक अशोक लेंगडे यांनी सुहास्य क्लबची स्थापना व क्लबचे कार्य याविषयी माहिती दिली. सदानंद लाटुकर, अरुण पुरी यांनी सुहास्य क्लबमुळे आरोग्य कसे चांगले राहते, याविषयी माहिती दिली.
डॉ. सुरेश पुरी यांनी सुहास्य क्लबला शुभेच्छा देत सुख-दुःखामध्ये सहभागी होऊन आरोग्य उत्तम ठेवण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. जगदीश बिर्जे यांनी सूत्रसंचालन तर मारुती जरळीकर यांनी आभार मानले. यावेळी सुहास्य क्लबचे सदस्य उपस्थित होते.









