ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने आज याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय दिला.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे वर्ग करावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच सुशांतच्या मृत्यूशी संबंधित भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयनेच करावा, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात सीबीआयला सहकार्य करावे, असेही कोर्टाने म्हटले आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्या राखीव निकालावर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला.