ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या दोघांच्या जामिनाबाबत उद्या दुपारी निर्णय घेण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
रियाचा भाऊ शोविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांच्यासह इतर आरोपींची NCB कोठडी काल संपली. त्यानंतर त्यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.
आता या सर्वांच्या जामिनावर उद्या दुपारी 12 वाजता फैसला होणार आहे. रिया चक्रवर्तीची जामिनाची याचिका याआधीच NCB कोर्टानं रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे रियाचे वकील ऍडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनी सत्र न्यायालयान आव्हान देणार आहेत.








