ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला होता. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास करत आहेत. तर मिरांडा एनसीबीच्या ताब्यात असून त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सॅम्युअल मिरांडाला अटक करण्यासाठी एनसीबीकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या घरातून एक डायरी एनसीबीने ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांची समोरा समोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.