प्रतिनिधी/ गोडोली
गोडोली परिसरातील ओढय़ावर झालेल्या अतिक्रमणाचा विषय प्रत्येक पावसाळयात फक्त चव्हाटय़ावर येतो. त्यावर कधीच कारवाई होत नसल्याने अनेक वेळी पूरपरिस्थिती अनुभवणाऱया गोडोलीकरांना मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आता तर एका बांधकाम ठेकेदाराने किल्ले अजिंक्यताऱयावरुन आलेला संपूर्ण सुळाचा ओढा बंदिस्त करण्याचे काम सुरु केले आहे. सदर बांधकामाचा Hue@ve संशयास्पद असून मोठय़ा प्रमाणावर उत्खनन केले असताना प्रशासनाने याबाबत तत्काळ योग्य कारवाई करावी, अन्यथा त्याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमोल खुडे यांनी दिला आहे.
ना ग्रामपंचायत, ना नगरपालिका अशी अवस्था असलेल्या ञिशंकू गोडोली भागात भैरोबाचा, काळंबीचा, सुळाचा आणि काही नैसर्गिक ओढे आहेत. स्वतःच्या सोयीने प्रत्येकाने ओढय़ावर सर्रास अतिक्रमण करत बांधकामे केलेली आहेत. हेच अतिक्रमण प्रत्येक वर्षी नागरिकांच्या मुळावर उठलेला अनुभव येतो. अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचे ओळखून सातारा हॉस्पिटलच्या शेजारी, आयुर्वे†िदक गार्डन समोर एका बडय़ा बांधकाम ठेकेदाराचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करत बांधकाम सुरु आहे. किल्ले अजिंक्याताऱयावरुन आलेल्या सुळाचा ओढय़ाला सदरच्या ठेकेदाराने बांधकामाच्या सोयीसाठी बंदिस्त करण्याचे काम सुरु असल्याचे निर्दशनास येते. याबाबत संबंधित बांधकामाचा Hue@ve मंजूर कसा झाला, हाच संशय व्यक्त होऊ लागला आहे.
याबाबत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ठेकेदाराने संपूर्ण सुळाचा ओढा बंदिस्त करण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले. मोठय़ा प्रमाणावर उत्खनन आणि ओढा बंदिस्त होत असताना प्रशासनाने कोणती दखल घेतली नसल्याने त्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे गोडोली शिवसेना शाखा प्रमुख खुडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. महसूल विभागाच्या अधिकाऱयांना याबाबत विचारणा केली असता ते अनभिज्ञ असल्याचे समजले. माहिती घेवून योग्य ती कारवाई करु, असे त्यांनी सांगितले.









