प्रतिनिधी/ येळ्ळूर
सुळगे (येळ्ळूर) ग्राम पंचायत निवडणूक अत्यंत चुरशीने लढविण्यात आली. नवोदित चेहऱयांना अधिक संधी देण्यात आली. गेली 5 वर्षे सलग अध्यक्ष राहिलेले अरविंद पाटील यांनी एकतर्फी निवडणूक जिंकत दुसऱयांदा सदस्य म्हणून ग्राम पंचायतीत प्रवेश मिळविला आहे. एकूण तीन गावांचा समावेश असून 4 वॉर्ड आहेत.
वॉर्ड क्र. 1 सुळगे (ये.)- मधील कार्यकर्ते अरविंद वसंत पाटील, जयदेव जोतिबा कुकडोळकर, यमुनाबाई नरेश पाटील, गंगव्वा सिद्धाप्पा नाईक (बिनविरोध), वॉर्ड क्र. 2 राजहंसगड- जोतिबा सहदेव थोरवत, सुमित्रा श्रीकांत पावशे, वॉर्ड नं. 3- लक्ष्मी महेश तावशे, दत्ता जोतिबा पवार, वॉर्ड क्र. 4 यरमाळे- हणमंत रायाप्पा बोरख, रेणुका शहानूर महार (बिनविरोध).









