प्रतिनिधी / बेळगाव
सुळगे ते येळ्ळूर या दोन कि. मी. च्या संतर्क रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. रस्त्याचे नूतनीकरण करताना या रस्त्याची सर्व वाहतूक ठप्प झाली होती. आता रस्ता सुरू झाल्याने नागरिकांत समाधान पसरले आहे.
गेल्या वषीच्या अतिवृष्टीने रस्ता एकदमच खराब झाला होता. अनेक ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले होते. सुळग्यापासून अर्ध्या कि. मी. अंतरावरील 100 फूट रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रामुख्याने दोन्ही गावच्या शेतकऱयांना हा रस्ता वरदान आहे. सुळगे गावचे नागरिक सर्रास याच रस्त्याने बेळगावला ये-जा करतात. येळ्ळूरवाडी परिसरातील बहुतांश कामगार खानापूरकडे जाण्या-येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याचे काम मजबूत करण्यात आल्याने संबंधित नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









