प्रतिनिधी / कुरुंदवाड
कागल आणि शिरोळ तालुक्यावर कोणत्याही अन्याय न होता इचलकरंजी शहराला सुळकुड बंधाऱ्या च्या पुढे 1300 मिटर अंतरावर नवीन बंधारा बांधून तेथूनच इचरकंजी शहराला पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा विचार आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी औरवाड तालुका शिरोळ येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कृष्ण नदीपलीकडे सात गावात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकी नंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला असता ते बोलत होते.
खासदार माने म्हणाले की सुळकूड दुधगंगा नदीतून पाण्याचा उपसा करणाऱ्या चा अर्थ जुन्या योजनेतून पाणी उपसा केला जाणार नाही त्यासाठी या बंधाऱ्याच्या पुढे तेराशे मीटर अंतरावर नवीन बंधारा बांधून या दोन्ही बंधारा दरम्यान असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाण्यातून उपसा करून इचलकरंजी शहराला पाणी देण्याचा शासनाचा विचार आहे तसा शासनाकडे प्रस्ताव दिला आहे कुणीही या योजनेबाबत गैरसमज पसरवू नये पिण्याचं पाणी हक्काचं असतो त्यामुळे त्याला कोणी विरोध करू नये नवीन बंधारा बांधल्यामुळे जुन्या बंदरातून पाणी सोडून नदी प्रवाहित ठेवली तरच हे पाणी मिळणार आहे तसेच नवीन बंधाऱ्यामुळे कागल तालुक्याला बारमाही पाणी मिळणार आहे.
ते म्हणाले चार टीएमसी पाणी कर्नाटक राजाला देण्याचा लवाद महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनाचा आहे यामध्ये अडीच टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा काळमवाडी धरणात आहे आज इचरकंजी शहराला अर्धा टीएमसी पाण्याची गरज आहे त्यामुळे दोन टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा धरणात राहणार आहे चाळीस वर्षानंतर इचरकंजी शहराला एक टीएमसी पाण्याची गरज लागणार आहे त्यामुळे या नवीन योजनेमुळे कोणावरही अन्याय होणार नाही यामध्ये संपूर्ण कागल तालुका असो वा शिरोळ तालुक्यातील प्रभावीत असणारी7ते 8 खेडी असो यांचा यात समावेश आहे.
कागल तालुका व शिरोळ तालुक्यावर कोणताही अन्याय न होता योजना कशी पूर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून याची खातरजमा झाल्यानंतरच या योजना खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला जाईल खासदार माने यांनी यावेळी नमूद केले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना तालुकाप्रमुख सतीश मलमे माझी सभापती कमृद्दिन पटेल अबिद पटेल सलीम मुल्ला उपस्थित होते.
Previous Articleबायजूसचा डेकाकॉर्न क्लबमध्ये समावेश
Next Article पाच महिन्यात चिनी उद्योगाचा नफा 19 टक्क्मयांनी घसरला









