प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाक तालुक्मयातील सुलधाळ ग्राम पंचायत कार्यालयासमोर मनरेगा व असंघटित कामगार संघ यांच्यावतीने महिलांनी धरणे धरले. गेल्या दीड महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत गावकऱयांना पंचायतीमार्फत काम देण्यासाठी संघटनेमार्फत ज्ये÷ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर व राहुल पाटील यांनी मागणी केली आहे. यासाठी हे धरणे धरण्यात आले.
अडव्याप्पा कुंबरगी, कविता मुरकुटे, कमला पुजारी, रामा नंदी, लक्ष्मी नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. कोरोना काळात अनेक जणांनी नोकऱया गमावल्या असून त्यांना सरकारने लवकरात लवकर काम द्यावे. अन्यथा, उग्र आंदोंलन छेडण्याचा इशारा राहुल पाटील यांनी दिला आहे..









