प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या 60 व्या स्वातंत्र्यदिनी प्रा. सुर्लकरांचे 3 रे पुस्तक ‘सूर्य- कांती’ या पुस्तकाचे प्रकाशन हीरक महोत्सवी दिनी संपन्न झाले. 1957 च्या गोवा स्वातंत्र्य संग्रामाचे संक्षिप्त चित्रण लेखक प्रा. विलास सोनू सुर्लकर यांनी या पुस्तकात केले आहे. सारस्वत विद्यालय संस्थेच्या काकुले कॉमर्स कॉलेजच्या छोटय़ा सभागृहात कॉलेज व अनुजा प्रकाशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी पांडुरंग रा. नाडकर्णी, लेखक प्रा. विलास सोनू सुर्लकर हे आसनस्त होते. पुस्तकाचे प्रकाशन करताना गावा स्वातंत्र्याचा थोडासा इतिहास लेखकाने उत्कृष्टपणे रेखाटला आहे. गोव्याचा विकास करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने जागृत असायला हवे. असे प्रा. नाडकर्णी यांनी भाषणात सांगितले.
डॉ. पाटकर यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ.शर्मीला बोरकरनी सर्वांची ओळख करुन दिली. प्र. सुर्लकर यांनी थोडक्यात गोवा संग्रामाविषयी सांगितले. प्राध्यापक दिक्षा तोरस्कर हिने आभार प्रदर्शन केले. तत्पूर्वी प्रा. विलास सुर्लकरांच्या हस्ते प्रमुख वक्ते प्रा. नाडकर्णी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.









