पुणे / प्रतिनिधी :
पुणे येथील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए-टीआयएफआर) च्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सुर्याच्या सर्व भागांवर वर होणार्या छोट्या विस्फोटातून निघणार्या सूक्ष्म रेडीओ प्रकाशझोतांचा नुकताच शोध लावला आहे.

शास्त्रज्ञांच्या गटाने मर्चीसन वाईल्डफिल्ड अरे (एम डब्लू ए ) या दुर्बिणीतून घेतलेला डाटा व एनसीआरएमध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे. अशा प्रकारच्या चुंबकीय विस्फोटाचे धुम्र लोट शास्त्रज्ञांना आढळून आल्याचा पुरावा प्रथमच जगसामोर आणला आहे. हे संशोधन ‘एनसीआरए’ येथील प्रा. दिव्य ओबेरॉय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असणारे विद्यार्क्षी सुरजित मोंडल व पूर्व पीएचडी विद्यार्क्षी डॉ. अतुल मोहन, जे सध्या नॉर्वेच्या रोझलँड सेंटर फॉर सोलर फिजिक्स येथे कार्यरत आहेत, या शास्त्रज्ञांच्या गटाने केले आहे.









