वाळपई / प्रतिनिधी
गोवा राज्यातील निसर्गप्रेमी व सत्तरी तालुक्मयातील सुपुत्र सूर्यकांत गावकर यानां गोवा सरकारच्या जैवविविधता मंडळाचा जैवविविधता संवर्धन पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचा प्रदान सोहळा 2 ऑक्टो?बर रोजी गोवा सरकारतर्फे करण्यात येणार आहे .रोख रुपये पंचवीस हजार व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून यामुळे सत्तरी तालुक्मयातील जनतेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सतरी पत्रकार संघातर्फे सूर्यकांत गावकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून आतापर्यंत पर्यावरण संवर्धन निसर्ग परीक्षण यांच्यासाठी त्यांनी दिलेले सहकार्य व केलेले कष्ट यांच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे पोचपावती असल्याचे प्रसिद्धी पत्रक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांनी जारी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील सूर्यकांत गावकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण यांच्यासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत .दरवषी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक देखावे व गणेशमूर्ती सादर करून वेगवेगळय़ा प्रकारचा मंत्र समाजाला देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पर्यावरण रक्षणाचा मंत्र जोपासला जात आहे. कमी शिक्षण असतानासुद्धा त्याला निसर्गाबद्दल आत्मीयता व प्रेम निर्माण झाल्यानंतर त्यांनी या संपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान दिले .आतापर्यंत निसर्गसंपदा मधील अनेक प्रकारच्या झाडांच्या जाती त्यांचे संवर्धन व वनौषधी उपाय यांच्या संदर्भात चांगल्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे .गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक महोत्सवाच्या होळी उत्सवात इको प्रेंडली रंग निर्मिती करून त्याची चांगल्या प्रकारे वितरण करण्यात येत असतात. त्यांचे शिक्षण कमी असले तरीसुद्धा त्यांनी आतापर्यंत वनसंपदेच्या बाबतीत केलेले कार्याच्या अभ्यासाचा वापर करून अनेकांनी संशोधनात्मक प्रबंध लिहून पीएचडी प्राप्त केलेली आहे.
जैवविविधता विकास व शाश्वत विकास यावर त्याने आतापर्यंत चांगल्या प्रकारची भर दिलेली आहे. त्यांनी स अगणितपणे केलेल्या कार्याची दखल गोवा सरकारने घेऊन गोवा जैवविविधता मंडळातर्फे जैवविविधता संवर्धन पुरस्कार त्यांना जाहीर केलेला आहे. यापुरस्कारासाठी अनेकांनी नामांकन केले होते. मात्र सूर्यकांत गावकर याचे जैवविविधतेच्या बाबतीत केलेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड करण्यात आल्याचे एकूण मिळालेल्या माहितीचा समजते. 2 ऑक्टो?बर रोजी गोवा सरकारतर्फे एका खास कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .
दरम्यान यासंदर्भात सूर्यकांत गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जैवविविधता संवर्धन करण्याची आवड आपले गुरु व पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर आपल्याला वारंवारपणे मिळालेल्या प्रोत्साहनाच्या पार्श्वभूमीवर आपण यासंदर्भात कार्य करु शकलो. यामुळे आपल्याला प्राप्त झालेला पुरस्कार हा राजेंद्र केरकर यांची प्रेरणा व आपले मित्र मंडळी व सबंध गोव्यातील निसर्गप्रेमी दिलेल्या सहकार्याच्या पाठबळावर प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. या पुरस्कारामुळे आपल्याला आनंद झाला असून येणाऱया काळात या क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी हे आपल्यासाठी विटामिन असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.









