सुरेश माडकर यांनी माफी मागण्याची केली मागणी
वाळपई/प्रतिनिधी.
होंडा पंचायतीचे माजी सरपंच सुरेश माडकर यांना निरीक्षकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ बुधवारी नागरिकांनी होंडा पोलीस चौकीवर मोर्चा नेला होता. त्याच प्रकरणाला अनुसरून गुरुवारी याला वेगळेच वळण लागून सुरेश माडकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोलये व होंडा गावकरवाडा येथील नागरिकांनी होंडा पोलीस चौकीवर मोर्चा नेऊन आक्रमकपणे मागणी केली.
त्यानंतर मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी सुरेश माडकर यांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला .यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस डिचोली पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे वाळपई पोलिस स्थानकाच्या अतिरिक्त भार सांभाळणारे पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर आजचा मोर्चा मागे घेण्यात आला. दोन दिवसात सुरेश माडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन सरकारच्या यंत्रणेकडून देण्यात आले आहे.
दत्ताराम गावडे यांना मारहाण
दरम्यान बुधवारी सोलये खाणीवरील खनिज मालाची वाहतूक करताना ट्रक मालक दत्?ताराम गावडे याना सुरेश माडकर व सागर नाईक यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती. या संदर्भातील तक्रार पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आलेली आहे.बुधवारी पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सुरेश माडकर यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोठय़ा प्रमाणात पोलिस चौकीवर मोर्चा नेऊन त्यानंतर पोलिस निरीक्षकानी माफी मागितली होती .मात्र सुरेश माडकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही .याच्या विरोधात सोलये होंडा गावकरवाडा येथील नागरिकांनी होंडा पोलीस चौकीवर सकाळी दहा वाजता मोर्चा नेऊन त्यांना अटक करून कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे केली.
सुरेश माडकर यांनी होंडा पोलीस चौकी समोर येऊन ग्रामस्था?च्या समोर माफी मागावी अशा प्रकारचे जोरदार मागणी सकाळी पोलिस चौकीवर मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली. यावेळी मोठय़ा प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या. यामध्ये खास करून सोलये गावातील नागरिक व होंडा गावकरवाडा येथील नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व स्थानिक पंचायत सभासद प्रतिक्षा गावडे यांनी केले होते.
एक तासाच्या आत सुरेश माडकर यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला. याठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक महेश गडेकर व डिचोली पोलीस उपाधिक्षक गुरुदास गावडे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे .कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर दोन दिवसात अटकेची कारवाई होणार आहे .यामुळे नागरिकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये अशा प्रकारची विनंती करून त्यांच्या घरावर मोर्चा नेऊ नये अशा प्रकारचे विनंती केली होती. मात्र या विनंतीला कोणत्याही प्रकारची दाद न देता मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी सुरेश माडकर यांच्या घरावर मोर्चा नेऊन आपला संताप व्यक्त केला .अनेक वेळा घरातील घंटा वाजवूसुद्धा त्याने दरवाजां न उघडल्यामुळे शेवटी मोर्चेकऱयांनी आपला मोर्चा त्यांच्या सुजय हॉटेल या आस्थापनाकडे वळविला असता व ते बंद करण्याची मागणी केली. यावेळी बऱयाच प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती .मात्र पोलिस फाटा तनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.
दरम्यान नागरिकांनी यावेळी सुरेश माडकर दहशत माजवीत असून त्यांच्यापासून संबंधित गावातील नागरिकांच्या जिवाला धोका असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांना आश्वस्त करताना पोलिसांनी गावामध्ये संरक्षण देण्याची आश्वासन दिलेले आहे. पोलिसांची यंत्रणा गावाच्या ग्रामस्था?च्या मागे खंबीरपणे उभी असून कोणत्या प्रकारची भीती बाळगणे गरजेचे नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेली आहे.








