बेळगाव तालुक्मयात 67 गावांमध्ये काम पूर्ण : खानापूर तालुक्मयात 566 कि.मी.वाहिन्यांचे काम : अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव व खानापूर तालुक्मयात अंदाजे 40 ते 45 वर्षांपूर्वी वीजवाहिन्या व विजेचे खांब घालण्यात आले होते. परंतु हे खांब व वाहिन्या जीर्ण झाल्या असून मागील दीड वर्षांपासून ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही तालुक्मयात मिळून 1554.194 कि. मी. लांबीच्या वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. उर्वरित गावांना येत्या मार्च महिन्यापर्यंत विजेच्या वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विजेचा सुरळीत पुरवठा करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात 40 वर्षांपूर्वीच्याच वाहिन्या असल्यामुळे जीर्ण होऊन अपघात होत होते. जुन्या वाहिन्यांमुळे त्या वारंवार निकामी होत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. विजेचा धक्मका लागून जनावरांचाही जीव जात होता. या वाहिन्या हेस्कॉमच्या कर्मचाऱयांसाठीही डोकेदुखीच्या ठरत होत्या. वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याने त्यांचा अधिकतर वेळ यामध्येच जात होता. त्यामुळे जुन्या वीजवाहिन्या बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती.
बेळगाव तालुक्मयातील 76 गावांचा समावेश
बेळगाव तालुक्मयात आतापर्यंत 67 गावांमध्ये नव्या वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. या गावांना 987 कि.मी.च्या वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. 239 विद्युत खांब बदलण्यात आले आहेत. उर्वरित 19 गावांना मार्चपर्यंत वाहिन्या घालण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
खानापूर तालुक्मयातील ग़्47 गावांचा समावेश
खानापूर तालुक्मयात अनेक गावे दुर्गम भागात असल्याने तेथपर्यंत वीजवाहिन्या घेऊन जाणे जिकिरीचे होते. त्यातच या भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने अनेक समस्या येत होत्या. अशा परिस्थितीतही 47 गावांमध्ये एकूण 116 विद्युत खांब बदलण्यात आले आहेत. 566.704 कि.मी.च्या वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मार्चपर्यंत उर्वरित 117 गावांमध्येही नव्याने वाहिन्या घालण्यात येणार आहेत.
कामाच्या पूर्ततेनंतर सुरळीत वीजपुरवठा शक्य
बेळगाव व खानापूर तालुक्मयातील गावांमध्ये जुन्या वीजवाहिन्या व खांब बदलण्यात येत आहेत. बेळगाव तालुक्मयातील 67 तर खानापूर तालुक्मयातील 47 गावांना नव्या वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. या सोबतच धोकादायक विद्युत खांबही बदलण्यात आले आहेत. येत्या मार्चपर्यंत उर्वरित गावांमध्ये वीजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा करणे शक्मय होणार असल्याचे हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते प्रवीणकुमार चिकाडे यांनी सांगितले.









