ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकोरमाइकोसिसचा (काळी बुरशी) धोका वाढला आहे. सुरतमध्ये मागील 15 दिवसात म्यूकोरमाइकोसिसची 40 प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी आठ रुग्णांची दृष्टी गेली असून, त्यांचे डोळे काढावे लागले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग कोरोनामुळे पसरत आहे. त्यावर उपचार केले जाऊ शकतात. मात्र, उपचारास उशीर झाला किंवा उपचार उपलब्ध झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
सुरत व्यतिरिक्त देशाच्या इतर भागातही म्यूकोरमाइकोसिस रुग्णांची नोंद आहे. मुंबईत सुहास नामक एका 29 वर्षीय तरुणालाही म्यूकोरमाइकोसिसचा संसर्ग झाला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर सुहासमध्ये म्यूकोरमाइकोसिसची लक्षणे दिसू लागली. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रियाकरण्यात आली. संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचू नये, म्हणून डॉक्टरांनी सुहासचा वरचा जबडा काढून टाकला आहे.
सध्या मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये म्यूकोरमाइकोसिसचे 18 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.









