प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील कोरोनामुळे दोन मुद्रांक विक्रेत्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी आजपासून दि.18 पर्यंत काम बंद ठेवले आहे. त्याबद्दलचे निवेदन मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनीक संघटनेने दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनीक म्हणून कार्य करीत आहे. आमचा सर्व प्रकारच्या कामासाठी प्रत्यक्ष जनतेशी संपर्क येत आहे व सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्ही जिल्हयातील सर्वजण आपले मुद्रांक विक्रेते व दस्तऐेवज लेखनीक आपली कामे सामाजिक बांधीलकी म्हणून बंद करीत आहोत. नुकताच कोरोणामुळे पाटण येथील आमचा व्यवसासिक बंधु देवकांत यादव यांचा मृत्यु झाला तसेच कराड येथील आमचे सहकारी प्रकाश देखमुख यांचे देखील निधन झालेले आहे.
आम्ही जनता व सरकार यामधील महत्वाचा दुवा असून करोडो रुपयाचा महसुल शासन दरबारी जमा करीत असतो. तरी त्या अनुषंगाने आम्हाला कोविड सुरक्षा विमा कवच व अन्य सुविधा या शासनाकडून मिळाव्यात याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा तसेच आमच्या कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे व जनतेची सुध्दा काळजी घेणे हे आमचे कर्तव्य असलेमुळे आम्ही दि. 10 पासून दिनांक 18 पर्यत कामकाज बंद ठेवीत आहोत, असे म्हटले आहे.
सातारा येथील एक मुद्रांक विक्रेता दोन दिवसांपूर्वी बाधित
शाळा,कॉलेजच्या विध्यार्थीनाचे दाखले, रेशन कार्डचे काम यामुळे गर्दी वाढत आहे. सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या मुद्रांक विक्रेत्यांना कसलीही सुरक्षा नाही. दोन दिवसांपूर्वी एकास बाधा झाली असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. मुद्रांक विक्री करणाऱ्यांचे शेड सॅनिटायझर करण्यात आले.
Previous Articleकर्नाटक : आयएमडीचा काही भागात अतिवृष्टीचा इशारा
Next Article तेलगू अभिनेत्री कोंडापल्ली श्रावणीची आत्महत्या









