अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावेने नुकतीच लग्न गाठ बांधली. अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या निमंत्रितांच्या साक्षीने या जोडीचा संसार सुरू झाला. सुयश आणि आयुषी यांच्या साखरपुडय़ाचे फोटोही खूप व्हायरल झाले. 21 ऑक्टोबरला झालेल्या सोहळय़ाच्या फोटोलाही तितकीच दाद मिळाली.
लग्नानंतर सुयश व आयुषी यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले आणिं ते फोटोही या दोघांनी शेअर केले. हे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुयश मराठी मालिकांमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. तसेच त्याने काही सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. तर आयुषीने सौंदर्य स्पर्धेतील विजेतीपदापासून तिची कारकीर्द सुरू केली. आयुषी उत्तम डान्सर असून ती डान्स ऍकॅडमीही चालवते.
संकलन – अनुराधा कदम









