वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीमध्ये सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमीत नागलने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इटलीच्या बिगर मानांकित गियानेसीचा पराभव केला.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या सामन्यात नागलने गियानेसीचा 0-6, 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. गेल्या आठवड्यात सुमीत नागलने जर्मनीत झालेल्या हेलब्रोन चॅलेंजर टेनिस स्पर्धा जिंकली होती.









