वृत्तसंस्था/ कॅग्लिअरी, इटली
सारदेना ओपन एटीपी 250 टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. तीन सेट्सच्या चुरशीच्या लढतीत त्याला स्लोक्हाकियाच्या जोजफ कोव्हालिकने हरविले.
नागल व कोव्हालिक दोघेही पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये दाखल झाले होते. पहिल्या फेरीच्या लढतीत कोव्हालिकने नागलवर 3-6, 6-1, 6-3 अशी मात केली. सुमारे सव्वादोन तास ही लढत रंगली होती. नागलने पात्रता फेरीतील दोन्ही सामने सरळ सेट्समध्ये जिंकले होते. पण ती कामगिरी कोव्हालिकविरुद्ध त्याला करता आली नाही.









