31 डिसेंबर रोजी पर्ससीन हंगाम संपुष्टात
प्रतिनिधी / रत्नागिरी
महाराष्ट्र सागरी अधिनियमांतर्गत पर्ससीन मासेमारी 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आह़े. त्यामुळे जिह्यातील 274 पर्ससीन नौका बंदरामध्ये स्थिरावणार आहेत़ 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राज्याच्या 12 वाव जलाधी क्षेत्रामध्ये पर्ससीन मासेमारीला परवानगी आह़े
सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीचा हंगाम आह़े. मात्र या दरम्यान पतिकूल वातावरण, अवकाळी पाऊस व वादळसदृश परिस्थितीमुळे पत्यक्षात मासेमारीसाठी काही दिवस मिळाल्याची माहिती पर्ससीन मच्छीमारांनी दिल़ी यामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले. याबद्दल वरीष्ठ स्तरावरुन मासेमारी कालावधी वाढवून देण्याची मागणी काही मच्छीमारांनी केली आह़े दरम्यान 1 जानेवारीननंतर पर्ससीन पध्दतीने मासेमारी करताना नौका आढळल्यास मत्स्य विभागामार्पत कडक कारवाई करण्यात येणार आह़े.
या दरम्यान पर्ससीन नौका मासेमारी करताना आढळून आल्यास संबंधित नौकेचा परवाना व नोंदणी रद्द होणार आह़े या बाबत राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी पर्ससीन हंगाम बंदची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व सहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिले आहेत़.









