बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना लस घेण्यास वयोवृद्ध लोक आघाडीवर आहेत. एका आठवड्यात एक लाखाहून अधिक वयोवृद्धांनी कोरोना लसीकरण करून घेतले आहे. तसेच याच काळात गंभीर आजारांनी ग्रस्त ४५ ते ६० वयोगटातील एकूण १६,४९७ जणांना लस दिली आहे.
सोमवारी राज्यात एकूण ५५,६१२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यासह, राज्यात आतापर्यंत एकूण ९,९६,६२६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कामगार यांचा देखील समावेश आहे.









