प्रतिनिधी / सावंतवाडी
सुप्रसिध्द नाट्य पार्श्वसंगीतकार प्रसाद विष्णू जोशी, (वय ५३ रा.वेत्ये, तालुका सावंतवाडी) यांनी सोमवारी पहाटे घरासमोरील मठात आजारपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या अकस्मित निधनाने नाट्यसृष्टीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते उत्कृष्ट पार्श्वसंगीतकार असून सिंधुदुर्गासह गोवा, रत्नागिरी येथील जवळपास २ हजार नाटकांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले होते. याच बरोबर त्यांचा टिव्ही दुरूस्तीचा व्यवसाय असून गावच्या पौरोहित्याचे कामही ते करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.