वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारती एअरटेल कंपनीचे प्रमुख सुनील भारती मित्तल यांचे वेतनाचे पॅकेज सन 2019-20 मध्ये तीन टक्क्मयांनी घटून 30.13 कोटी रुपयांवर राहिले आहे.
कंपनीच्या समभागांची किमत आणि अन्य मिळणाऱया लाभामध्ये कमी आल्याने पॅकेजमध्ये घसरण झाल्याची माहिती आहे. भारती एअरटेल लिमिटेडचे अध्यक्ष असल्याने 2018-19 मध्ये मित्तल यांचे वेतन आणि भत्ता 31 कोटी रुपयांच्या घरात होते.
कंपनीची वार्षिक उलाढाल लक्षात घेता मित्तल यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये सन 2016-17 नंतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
वास्तविकपणे त्यांच्या वेतनात घट होण्याचे मुख्य कारण समभाग किमती आणि अन्य लाभ हा मूळ घटक कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. मित्तल यांचे मूळ वेतन 2019-20 या काळात 26.97 कोटीवर राहिले आहे.









