मालवण / प्रतिनिधी:
मालवण बाजारपेठ येथे बेवारस स्थितीत उपचारासाठी असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती राजन करकरे याला स्थानिक नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालय याठिकाणी दाखल केले आहे.
राजन करकरे पायाच्या व्याधीने त्रस्त असल्याने त्यांना यापूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र काही दिवसातच ते तेथून परत आल्याने त्यांच्या पायाच्या व्याधीमुळे बाजारपेठ मध्ये त्यांची परिस्थिती पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केले होते करकरे यांची परिस्थिती ही माहिती मिळताच सुदेश आचरेकर यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांचे यांना सोबत घेऊन करकरे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे यापूर्वी अशाच प्रकारे अनेक बेवारस व्यक्तींना माणुसकीचे दर्शन दाखवत उपचारासाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदतही केली आहे. आचरेकर यांनी दाखवलेला माणुसकी बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
Previous Articleशिवसेना नवरात्रौत्सव अध्यक्षपदी राजू शेटये सचिवपदी राजू राणे
Next Article ‘वंचित बहुजन’ सर्व निवडणुका स्वबळावर लढणार









