अनेक शहरांवर प्रतिस्पर्धी सैन्यांचा विमानहल्ला
► वृत्तसंस्था / खार्तूम
सुदान देशातील गृहयुद्ध थांबविण्यासाठी सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने चाललेली चर्चा असफल ठरली आहे. त्यामुळे गृहयुद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. ही चर्चा जेद्दाह येथे सुऊ होती. सुदानचे सरकारी सैन्य आणि तेथील अर्धसैनिकी दले यांच्यापैकी कोणीही माघार घेण्यात तयार नसल्याने चर्चा फिस्कटली. दोन्ही सैन्यांना आपणच जिंकण्याच्या स्थितीत आहोत, असे वाटत असल्याने ते समझोता करण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे सौदी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
15 एप्रिलपासून सुदानमध्ये सरकारी सैन्य आणि तेथील अर्धसैनिक दले यांच्यात सशस्त्र संघर्ष सुऊ आहे. या संघर्षात आतापर्यंत 300 हून अधिक जणांचा बळी गेल्याचे अनुमान आहे. तसेच हजारो लोक बेघर झाले आहेत. सुदानमध्ये 3,000 हजारांहून अधिक भारतीय नागरीक अडकलेले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ‘कावेरी अभियान’ चालविलेले होते. या अभियानाअंतर्गत भारताने आपल्या सर्व नाग्&रिकांची सुटका केली आहे.
सौदी अरेबियाची मध्यस्थी
सुदानमधील भीषण हिंसाचार थांबावा, यासाठी सौदी अरेबियाने मध्यस्थी केलेली आहे. सौदी अधिकारी आणि सुदानच्या सैन्यांच्या प्रतिस्पर्धी गटांचे नेते यांच्यात दोन दिवस सलग जेद्दाह येथे चर्चा झाली. सोमवारी या चर्चेचा शेवट करण्यात आला. सौदी अधिकाऱ्यांना समेट घडवून आणण्यात यश आले नाही. टोकाची भूमिका सोडण्यास दोन्ही पक्ष तयार नाहीत. सुदान देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याची तेथील अर्धसैनिक दलांची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे ते संघर्ष थांबविण्यास तयार नाहीत. सरकारी सेनाही त्यांना कोणतींही सवलत देण्यात तयार नाही. त्यामुळे त्यांच्यात समझोता होणे अशक्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
जोरदार विमानहल्ले
शांतता बोलणी होत असतानाच प्रतिस्पर्धी सैनिक गटांनी परस्परांच्या शक्तीस्थानांवर जोरदार विमानहल्ले चढविले. यात अनेक शहरांची हानी झाली आहे. बाँबवर्षावामुळे 20 हून अधिक इमारती पडल्याचे वृत्त आहे. दोन्ही सैन्यदलांकडे लढावू विमाने असल्याने आता हा संघर्ष अधिकच चिघळणार असल्याचे दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
खार्तूममध्ये अक्षरश: युद्ध
सुदानची राजधानी खार्तूम या शहरात अक्षरश: दोन देशांमध्ये व्हावे तसे युद्ध सुऊ आहे, असे विदेशी पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. शहरात जाळपोळ, बाँबस्फोट, गोळीबार, हत्या आणि अपहरणे यांना ऊत आला आहे. विशेषत: बालके आणि महिला यांना सर्वाधिक धोका आहे. आतापर्यंतच्या संघर्षात साडेतीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून सुदानचे 60 हजार नागरिक ईजिप्तमध्ये, 30,000 नागरिक छाडमध्ये तर 27 हजार नागरिक दक्षिण सुदानमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या देशांनी आता त्यांच्या सीमा स्थलांतरितांसाठी बंद केल्याने सुदानी नागरिकांची कोंडी झाली आहे. संपूर्ण सुदानमध्ये वीज, अन्न आणि पिण्याचे पाणी तसेच इंधन यांचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून लोक जीव मुठीत धऊन कसेबसे दिवस कंठत आहेत, असे वर्णन विदेशी पत्रकारांनी केले आहे.









