ऑनलाईन टीम / खार्टूम :
हिंसाचारग्रस्त देश अशी ओळख असलेल्या सुदानमधील इस्लामी राजवट अखेर संपुष्टात आली आहे. त्यामुळे या देशात आता लोकशाही नांदणार आहे.
सुदानमध्ये जवळपास 30 वर्ष इस्लामी राजवट सुरू होती. त्याविरोधात सुदानमध्ये वर्षभर आंदोलन सुरू होते. अखेर सुदानचे पंतप्रधान अब्दुल अहमद आणि सुदान पीपल्स लिबरेशन मोमेंटचे नेते अब्दुल अजी यांच्यामध्ये इथिओपियाची राजधानी एडिस अबाबा येथे एका करारावर सही करण्यात आली. सुदानने धर्म आणि सरकार या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा निर्णय घेतला.
या करारामुळे सुदानच्या दारफुर आणि अन्य भागांमध्ये सुरू असलेला हिंसाचार आता थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या देशात आता लोकशाही नांदेेेल. सर्व नागरिकांचे हक्क आता निश्चित करण्यात येणार आहेत.
1989 मध्ये उमर अल बशीरने सुदानच्या सत्तेवर ताबा मिळवला. त्यानंतर त्याने देशामध्ये इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती.









