प्रतिनिधी / बार्शी
पोस्ट ऑफिसची सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याकारणाने लॉकडाऊनच्या काळात देखील पोस्ट ऑफिस सेवा देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सोलापूर विभागाचे प्रवर अधिक्षक डाकघर श्री एस एस पाठक व उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली, भारतीय टपाल खात्याने सोशल डिस्टन्सिंगमध्ये कायम राहील याची काळजी बार्शी उपविभागातील सर्व पोस्ट ऑफिस घेत आहेत.
बार्शीचे पोस्टमास्टर श्रीमती मंगल कांबळे, स.पोस्टमास्तर उल्हास सुतार, कर्मवीरनगर चे पोस्टमास्टर श्री महेश तोष्णीवाल यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालू असून बार्शी उपविभागात, पोस्टमन बांधवानी, सोमवारी ३ आगस्ट २०२० रोजीच्या रक्षाबंधन सणानिमित्त येणाऱ्या राख्या, सोशल डिस्टन्सिंग कायम राहील याची काळजी घेत रविवार २ ऑगस्ट २०२० रोजी सुट्टीच्या दिवशी देखील मास्क बांधून राखी वाटप केले.
उपविभागात बार्शी, कर्मवीरनगर याशिवाय पानगाव,वैराग, तुळशीदासनगर, नानज, अनगर, मानेगाव (थो.) आगलगाव, पांगरी, गौडगाव इत्यादी ठिकाणी पोस्टमन बांधव राखी वाटपाचे काम केले. याकामी बार्शीत रोहित घुमरे, शशिकांत कदम, अजित नडगिरे, रवींद्र बगाडे, संजय जोशी, बाळासाहेब पवार, श्रीराम बनसोडे, घनश्याम क्षीरसागर, राजाभाऊ मोरे, अनिल कांबळे, श्रीमंत घावटे, नागेश कोळी, लक्ष्मण काळे, सुहास देशमुख, राहुल पवार, प्रवीण चांडगे प्रकाश काकडे, आदीचे सहकार्य लाभले.
पोस्टमन बांधवानी दिलेल्या या सेवेबद्दल प्रशिध्द तिकीट संग्राहक मा. उदयकुमार पोतदार यांच्यसह अनेकांनी पोस्टमन बांधवाना धन्यवाद दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








