सौंदत्ती तालुक्यातील हिरूर येथील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
भाचीच्या लग्नासाठी सुटीवर आलेल्या एका लष्करी जवानाचा खून झाला आहे. सौंदत्ती तालुक्मयातील हिरुर येथे ही घटना घडली असून सौंदत्ती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. इराप्पा बसाप्पा पुजारी (वय 38) असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. आपल्या भाचीच्या लग्नासाठी 2 डिसेंबर रोजी तो सुटीवर गावी आला होता. लग्नपत्रिका वाटण्यासाठी 25 डिसेंबर रोजी तो घराबाहेर पडला होता. रात्री घरी आला नाही. दुसऱया दिवशी सकाळी गावाजवळील पडक्मया विहिरीत मृतदेह आढळून आला.
सौंदत्ती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू प्रकरण, असे या प्रकरणाचे स्वरूप होते. इराप्पाच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली आहे. पडक्मया विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आल्याने खुनाचा प्रकार असल्याचे सांगत कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लष्करी जवानाच्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोण व कोणत्या कारणासाठी खून केला, याचा उलगडा झाला नाही. सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी त्वरित खुन्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी करून त्या जवानाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.









