बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ही आमिर खानसोबतचा स्वतःचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करतेय. कहानी चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या एका थ्रिलर चित्रपटात करिना काम करणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात गँग्स ऑफ वासेपूरचे अभिनेते जयदीप अहलावत आणि गली बॉयमधील अभिनेता विजय वर्मा हे करिनासोबत दिसून येणार आहेत.

चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुजॉय या चित्रपटाबद्दल अत्यंत उत्सुक आहे. याचे चित्रिकरण दार्जिलिंग आणि कलिम्पोंगमध्ये होण्याची शक्यता आहे.
करिना लवकरच लाल सिंह चड्ढा चित्रपटात आमिर खानसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांनी काम केले होते.









