ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 एमकेआय या लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या चाचणीसाठी सुखोई विमान पंजाबमधून उड्डाण करुन विमान बंगालच्या उपसागरात दाखल झाले. यानंतर ही चाचणी घेण्यात आली. या तपासणीसाठी ‘ब्राह्मोस’ घेऊन उडत असलेल्या विमानात हवेतल्या हवेत इंधनही भरण्यात आले.
लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राचा वापर केला जातो. यापूर्वी जमिनीवरुन, समुद्रातील युद्धनौकेवरुन तसेच लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हवाई सीमेच्या रक्षणासाठी सुखोई 30 एमकेआय या लढाऊ विमानांची स्क्वाड्रन सज्ज झाली आहे.
भारत आणि रशियाने संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.ब्राह्मोस या क्रुझ क्षेपणास्त्राद्वारे 400 किमी लांबच्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करता येतो.









