प्रतिनिधी/ पणजी
पर्वरी युवा वेलफेयर ट्रस्ट यांच्यातर्फे आमदार रोहन खंवटे यांच्या सहाय्याने येत्या दि. 12 रोजी सुकूर पर्वरी येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वरी युवा वेलफेयर ट्रस्टला 10 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने या कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती साई फामर्स क्लबच्या किशोर सावंत यांनी दिली.
पणजी येथील हॉटेल सालिदा दी सोल येथे आयोजित पत्रकार परीषदेत किशोर सावंत यांनी ही माहीती दिली यावेळी त्यांच्यासोबत ट्रस्टचे रमेश हिरोजी, विनोद मळीक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या एकदिवसीय मेळाव्याच्या पहिल्या सत्रात शेती, शेतात वापरण्यात येणारी सामग्री, तांत्रिक शेती, शेतकऱयांसाठी असणाऱया विविध योजना याविषयी माहीती शेतकऱयांना देण्यात येणार आहे. तर दुसऱया सत्रात शेती तज्ञांचे व्याख्याने, दुग्धशाळा, मशिनांची प्रात्यशिके व मान्यवरांची भाषणे असणार आहे. असे सावंत यांनी अधिक माहीती देताना सांगितले.
सदर मेळावा सुकुर येथील वेताळ देवस्थानसमोरील शेतात भव्य मंडपात होणार आहे. यावेळी उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर, जलस्त्राsत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असणार आहे. तसेच त्यांच्यासोबत पर्वरीतील सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य देखील उपस्थित असणार आहे. असे सावंत यांनी पुढे सांगितले.
तसेच राज्यभरातील शेतकऱयांनी पर्वरी येथील या कृषी मेळाव्याला आर्वजुन यावे व या मेळाव्याचा पुरेपुर उपयोग आपल्या शेतीसाठी करावा असे आवाहन देखील किशोर सावंत यांनी यावेळी केले.









