प्रतिनिधी / सातारा :
262 व्या स्वराज्य प्रवेश दिनानिमित्त पाटण तालुक्यातील सुंदरगड येथे 4 थे शिवकाव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे अध्यक्ष व तरुण भारत सातारा आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
स्वराज्य प्रवेश दिनानिमित्त सुंदरगडावर दि. 15 रोजी 4 थे शिवकाव्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, सकाळी 10 वाजता शिवप्रतिष्ठापणा, ध्वजपूजन, देवता पूजन सत्यजितसिंह पाटणकर, दीपक प्रभावळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रदीप कांबळे, इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे, हेळवाकचे वनअधिकारी संदीप झोपाळे, संदीप कुंभार, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत पोतदार हे असून किल्ले सुंदरगड समितीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.









