बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी गुरुवारी सकाळी उत्तर बेंगळूरच्या येळहंका येथे नायजेरियन नागरिकांसह दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुमारे २५ लाख रुपयांचे ५०० ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी तीन मोबाइल फोन, एक वजनाची मशीन आणि एक होंडा दुचाकी जप्त केली आहे.









