ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यात अलकायदाचे 7 म्होरके ठार झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या प्रवक्त्या मेजर बेथ रिऑर्डन म्हणाल्या, 22 ऑक्टोबरला सीरियातील इडलिब प्रांतात अलकायदाच्या नेत्यांची बैठक चालू असतानाच अमेरिकेने त्यांच्यावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात अलकायदाचे 7 म्होरके ठार झाले आहेत.
ठार झालेल्या नेत्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत. मात्र, हे सात म्होरक्या ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर अमेरिकेने यासंदर्भात घोषणा केली आहे. अलकायदाला नेस्तनाभूत करण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे, असेही रिऑर्डन यांनी सांगितले.









