ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचा वापर भारतात सुरू होणार आहे.
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका यांनी भारतात आपल्या लसीचे उत्पादन करण्यासाठी सीरमशी करार केला आहे. सीरमने भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ नावाने तयार केली असून, या लसीचे भारतात सध्या 5 कोटी डोस तयार आहेत.
या लशीच्या साठवणुकीसाठी उणे 70 अंश सेल्सीयस तापमान आवश्यक आहे. त्यामुळे साठवणूक, वाहतूक सुविधा आणि दर यातिन्ही बाजूंनी विचार केला तर कोविशिल्डभारतासाठी सर्वार्थाने उपयुक्त असणार आहे.
दरम्यान, ब्रिटन हा ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.









