ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भयाची केस लढणाऱ्या वकील सीमा समृद्धी हाथरची केस निशुल्क लढणार आहेत. हाथरसमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या हाथरसकडे रवाना झाल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे, वकील विशाल ठाकरे आणि रुद्रप्रताप यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावी. तसेच सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून या चौकशीवर लक्ष ठेवण्यात यावे. या केसच्या निष्पक्ष चौकशीसाठी हे प्रकरण दिल्लीत हलविण्यात यावे.
तसेच या पीडितेवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार आरोपींनी पीडितेची जीभ कापली, मान आणि पाठीची हाडे तोडली, असेही याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पीडित मुलीचा मृत्यू झाला.
सीमा समृद्धी यांनी निर्भया केस लढली. त्या केसमध्ये मुकेश सिंग, अक्षयसिंग ठाकूर, पवनकुमार गुप्ता आणि विनयकुमार शर्मा या चार आरोपींना 20 मार्च रोजी फाशी देण्यात आली.









