युवा समितीचे कोल्हापूरच्या खासदारांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 65 वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न रखडला आहे. यामुळे सीमावासीय मराठी भाषिकांवर दडपशाही व अन्याय केला जात आहे. 50 वर्षे जुना आसाम-मेघालय या दोन राज्यांमधील सीमाप्रश्न सुटला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
खासदारांनी युवा समितीच्या पदाधिकाऱयांना आश्वासन देत आपण या प्रश्नासाठी गृहमंत्र्यांची भेट घेऊ, असे सांगितले. यावेळी महाराष्ट्राचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे युवानेते हर्षल सुर्वे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नारायण मुचंडीकर यांसह इतर उपस्थित होते.









